Crop loan मुख्यमंत्र्याची विधानसभेत मोठी घोषणा सरसकट कर्जमाफी जाहीर.

Crop loan नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारद्वारे शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर 1 जानेवारी 2024 पासून सरसगड शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येणार मुख्यमंत्र्यांची विधानसभेमध्ये मोठी घोषणा कर्जमाफी होणार अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरलेला आहे की नेमकं सत्य काय आहे तर ते नेमकं सत्य पुराव्यानिशी मी तुमच्यासमोर ठेवणार आहे.

सुरुवातीला कोरडा दुष्काळ नंतर अतिवृष्टी गारपीट अशा मध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे काय पिका घरी आणले त्या पिकाला सरकारकडून अपेक्षित दर मिळत नाही त्यामुळे उत्पादन खर्च भरून निघत नाही अशी संपूर्ण परिस्थिती असताना शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा ठेवण्यात एकाच चूक नाही परंतु सध्या सोशल मीडियावरचे व्हिडिओ व्हायरल होतात त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचा पुरावा न देता शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे तर नेमका सत्य काय विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी काय माहिती दिली ते बघून घ्या.

येथे क्लिक करून पाहा

ही माहिती तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणतात की 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सरकार असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना यांच्या माध्यमातून जी कर्जमाफी केली होती त्या कर्जमाफीमध्ये 6 लाख 56 हजार शेतकरी वंचित राहिले होते तर त्या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता आम्ही कर्जमाफी देणार किंवा आम्ही त्यांना तो लाभ देणार पहिला मुद्दा तुम्ही लक्षामध्ये घ्या.

दुसरा मुद्दा असा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 2019 ला जे महाविकास आघाडीचे सरकार आलं त्या सरकारमध्ये त्यांनी काय केलं की त्यांनी सुद्धा एक कर्जमाफीची घोषणा केली आणि त्या कर्जमाफीमध्ये असा मुद्दा उपस्थित झाला की नेहमी जर अशी कर्जमाफी होत राहिली तर रेगुलर भरणारे शेतकरी सुद्धा कर्ज भरणार नाही त्यामुळे सगळे शेतकरी कर्ज थकवायला लागतील आणि सगळ्यांनी थकला तर ते योग्य होणार नाही म्हणून जे शेतकरी नियमित कर्ज भरतात तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण प्रोत्साहन पर अनुदान दिलं पाहिजे पण ते अनुदानाची घोषणा उद्धव ठाकरे सरकारने केली परंतु त्यासाठी आर्थिक तरतूद केली नाही ती आर्थिक तरतूद आता आम्ही करतोय अशा पद्धतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये केलेली आहे.

अशा पद्धतीच्या दोन घोषणा आहेत आणि या दोन घोषणांना एडिट करून शेतकऱ्यांना 2024 मध्ये कर्जमाफी मिळणार किंवा या अटी शर्तीपुर्त केल्या तर तुम्ही सुद्धा कर्जमाफीचा लाभ घेऊ शकणार किंवा सरसकट कर्जमाफी मिळणार अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ ते शेतकऱ्यांना संभ्रमावस्था शेतकऱ्यांमध्ये निर्माण करणारे आहेत आणि त्याच्याकडे शेतकऱ्यांना लक्ष देऊ नये तुम्ही जो आता स्क्रीनवर मी तुम्हाला पुरावा दाखवलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने काय सांगितलेला आहे.

 

Leave a Comment