Board exam 10 वी ,12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर, येथे पहा वेळापत्रक

Board exam नमस्कार मित्रांनो, दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तर 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. तर 1 मार्च 2024 ते 22 मार्च 2024 या कालवधीत दहावीची लेखी परीक्षा होणार आहेत.

28 ऑगस्ट 2023 रोजी परिपत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

संपूर्ण राज्याभरात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या एकूण नऊ विभागीय मंडळाकडून दहावी व बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. Board exam

बोर्डाच्या फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे हे संभाव्य वेळापत्रक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना व तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने हे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले असं बोल जात आहे.Board exam

प्रचलित पद्धतीनुसार दहावी आणि बारावीच्या ह्या लेखी परीक्षा आयोजित करण्यात येतील याची सर्व शाळा, महावियालये, विद्यार्थी व तसेच पालकांनीही नोंद घ्यावी असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलेले आहे.

वेळापत्रकाची देण्यात आलेली मंडळाच्या संकेतस्थळावरील सुविधा ही फक्त सर्वांच्या माहितीसाठी असून, परीक्षेपूर्वी सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, व तसेच कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे परीक्षेचे वेळापत्रक हे अंतिम ग्राह्य धरण्यात येईल असे मंडळाकडून सांगण्यात आलेले आहे.Board exam

10 वी आणि 12 वी वेळापत्रक :- वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा⬇️

संभाव्य वेळापत्रक इ. १० वी मार्च २०२४ येथे क्लिक करा

संभाव्य वेळापत्रक इ. १२ वी फ्रे/मार्च २०२४ व्यवसाय अभ्यासक्रम येथे क्लिक करा

संभाव्य वेळापत्रक इ. १२ वी फ्रे/मार्च २०२४ सर्वसाधारण येथे क्लिक करा

परीक्षेच्या तारखांची खात्री मंडळाकडून देण्यात आलेल्या छापील वेळापत्रकावरून करून संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी,अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आलेली आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने इतर संकेतस्थळ, अन्य यंत्रणांवरील छापील वेळापत्रक किंवा social media च्या माध्यमातून व्हायरल होणारे दहावी व बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक ग्राही धरू नये अशा प्रकारच्या सूचनाही या परिपत्रकातुन करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना वेळोवेळी कळविण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

अधिक महितीसाठी www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. Board exam

Leave a Comment