Employee राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्ता वेतनात चक्क दीडपट वाढ GR निर्गमित

Employee सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे महागाई भत्ता व वेतनात चक्क दीडपट वाढ करणे बाबत शासन निर्णय निर्गमित.

दिनांक 20 6 2023 रोजी तर पाहूया हा जीआर खालील प्रमाणे सविस्तर.तर नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली, अहेरी, व गोंदिया, जिल्ह्यातील अति संवेदनशील पोलीस ठाणे पोलीस उपटाने आणि सशस्त्र दुरक्षेत्रे व कार्यालय येथे व अति संवेदनशील क्षेत्र कार्यरत विविध शाखांचे पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना अनुदानही वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता देणे संदर्भात राज्य शासनाच्या गृह विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक २० जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोली, आहेरी, व गोंदिया, जिल्ह्यातील अति संवेदनशील क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना अनुज्ञेय वेतन दीडपत दराने मूळ वेतन व महागाई भत्ता देण्यात यावा त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील उद्देशिकेतील अनुक्रमांक (चार) येथील दिनांक 18 फेब्रुवारी 2011 च्या शासन निर्णय निश्चित करण्यात आलेले आहे. ठाणे पोलीस ठाणे पोलीस उप ठाणे सशस्त्र दुरक्षत्र व कार्यालयामध्ये कार्यरत असलेले अखिल भारतीय सेवेतील अधिकारी व राज्यसेवेतील अधिकारी कर्मचारी यांना अनुज्ञेय मुळ वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता देण्यात यावा असा निर्णय देण्यात आला आहे.

येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती

Leave a Comment