घरकुल मंजूर झाले परंतु जागा नाही! आता नो टेन्शन | 2022 असे मिळेल 1.20 लाख + 50 हजार अनुदान | gharkul anudan

 सन 2020-21 मध्ये राज्यात असे काही लाभार्थी होते ज्यांना घरकुल मंजूर झाले पण ते बांधण्यासाठी त्यांना जागा नव्हती तर अशा 50 हजार 112 भूमिहीन लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून जागा उपलब्ध करुन देण्यात आली होती, यामुळे जागेअभावी रखडलेल्या लाभार्थ्यांचेही घराचे स्वप्न पूर्ण झाले.


घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी 30 डिसेंबर 2015 मध्ये पंडित दिन दयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली. आणि या योजनेचा लाभ (1) प्रधानमंत्री आवास योजना (2) रमाई आवास योजना (3) शबरी आवास योजना या तीन योजनेतील लाभार्थ्यांना मिळत असतो. तसेच त्यांना जागा खरेदीसाठी केंद्र शासनामार्फत 10,000 व या योजनेअंतर्गत 40,000 असे एकूण 50,000 रुपये अनुदान दिले जाते.

असा मिळेल योजनेचा लाभ

पंडित दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेमार्फत 50,000 रुपये अनुदान मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अर्ज करावा लागत नाही. ग्रामसेवकला भेटून त्यांच्याकडे भूमिहीन असल्याचा दाखला द्यायचा आहे यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे,त्या समितीच्या माध्यमातून लाभार्थ्याला गावामध्येच जागा खरेदी करून दिली जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम व अटी खालील प्रमाणे


 (1) लाभार्थी हा प्रधानको बरी/रमाई आवास

योजना यापैकी लाभधारक असावा 

(2) लाभार्थी भूमिहीन तसेच मागासवर्गीय असावा तयार असेल तर लाभ घेऊ शकतो. |

(3) लाभार्थी हा 50 हजार वरील रक्कम भरण्यास

1 thought on “घरकुल मंजूर झाले परंतु जागा नाही! आता नो टेन्शन | 2022 असे मिळेल 1.20 लाख + 50 हजार अनुदान | gharkul anudan”

Leave a Comment