ई-श्रमकार्ड योजना | आता 1 रुपया सुद्धा न भरता ळणार महिन्याला 3000 | e shram card yojana

 महाराष्ट्रात आतापर्यंत जवळपास 23 लाख लोकांनी ई-श्रम कार्ड योजनेमध्ये नोंदणी केली आहे, आणि या सर्वांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन चालू होईल अशी माहिती कृषी मंत्रायलातर्फे देण्यात आली आहे.


ई-श्रम मानधन योजनेचे हे आहेत नवीन फायदे:


(1) ज्या शेतकऱ्याने पेन्शनसाठी नोंदणी केलेली असेल आणि त्या शेतकऱ्याचा 60 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर मृत्यू झाला तर या योजनेचे उर्वरीत हप्ते भरून त्या शेतकऱ्याची पत्नी ही योजना सुरू ठेऊ शकते. त्याच्यानंतर त्या पत्नीचे वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तीला ही 3 हजार रुपये पेन्शन महिन्याला मिळणार आहे. किंवा त्या शेतकऱ्याचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि त्याच्या पत्नीला उर्वरीत हप्ते भरायचे नसतील तर जेवढी रक्कम त्या शेतकऱ्याने या योजनेत भरली असेल, ती रक्कम आणि त्या रक्कमेवरील व्याज त्याच्या पत्नीला मिळेल.

ई-श्रम मानधन योजनेचे हे आहेत नवीन फायदे:


(2) जर समजा एखाद्या शेतकऱ्याचा 60 वर्षापूर्वीच मृत्यू झाला आणि त्याला जर पत्नी नसेल तर त्याच्या वारसदाराला ही रक्कम मिळेल तसेच जर समजा वारसदार नसेल तर ही सर्व रक्कम सरकार जमा होईल.

(3) जर एखाद्या शेतकऱ्याचे वय 60 वर्ष पूर्ण झाले आणि त्याला 3 हजार रुपये पेन्शन चालू असताना त्याचा मृत्यू झाला तर पुढे त्याच्या पत्नीला 50 टक्के प्रमाणे महिन्याला दीड हजार रुपये (1500) पेन्शन मिळेल.

या शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा न भरता या योजनेचा लाभ घेता येणार माहिती खालील प्रमाणे :


जे PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना वर्षाला तीन टप्यांमध्ये 2 हजार प्रमाणे 6 हजार रुपये मिळतात त्यांना या पेन्शन योजनेचा मोफत लाभ मिळवता येणार, त्यासाठी त्यांनी बँकेत जाऊन (Auto Debit) नावाचा फॉर्म असतो तो भरून द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्यांना जे वर्षाला 2 हजार प्रमाणे 6 हजार रुपये मिळतात त्यातूनच या पेन्शन योजनेचे पैसे खात्यावरून कट होत राहणार, त्यांना खिशातुन 1 रुपया सुद्धा भरण्याची आवश्यकता नाही.

1 thought on “ई-श्रमकार्ड योजना | आता 1 रुपया सुद्धा न भरता ळणार महिन्याला 3000 | e shram card yojana”

  1. केंद्र सरकार चा निर्णय चांगला आहे परंतु फक्त शेतकऱ्यांचा विचार केला मजूर कष्टकरी कामगार यांचा पण शासनाने विचार करून काहीतरी धोरणात्मक उपाय राबवायला पाहिजे

    Reply

Leave a Comment