फळ पिक विमा योजनेसाठी निधी वितरित | fal pik vima 2021

 राज्यात शेतकऱ्यांच्या फळ बागांनां होणाऱ्या विविध प्रकारांच्या हवामान धोक्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत याच धोक्यापासून आर्थिक नुकसान शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्य आपत्तीच राखण्यासाठी पुनरचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना राबविण्यात येत आहे.विविध हवामान धोक्यांमुळे फळ पिकाच्या उत्पादनामध्ये विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते.

पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकट तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळ पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पूर्ण पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना राज्यात 2021-22,2022-23,2023-21 तीन वर्षात संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू , लिंबू, सिताफळ व द्राक्ष. या आठ पिकांसाठी 26 जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून HDFC AGRO, Reliance General insurance, AIC OF INDIA या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.2021 मध्ये अतिवृष्टी शेती पिकाची शेती पिकाचे, फळबागाची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, या नुकसानाच्या भरपाईसाठी अनेक शेतकऱ्यांना क्लेम देखील केलेले आहेत, हे नुकसान भरपाई चे दावे निकाली काढण्यासाठी देखील विमा कंपनीला निधी असलेली गरज व विमा कंपनीची मागणी विचारात घेता 2021 च्या मृगबहार फळपिक विमा योजनेसाठी निधी वितरित करण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. शासन निर्णयानुसार पिक विमा कंपनीला राज्य शासनाच्या हप्ता साठी ₹ 17.77 कोटी एवढी रक्कम वितरीत करण्याची मंजुरी दिली आहे


शासन निर्णय खालील लिंक वर पहा.

👇🏻👇🏻👇🏻


पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2021 साठी राज्य हिस्साची रु. 17,77,39,682/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.


Leave a Comment