E-Pik Pahani Kashi Karavi | रब्बी ई पीक पाहणी केली नाही ?

 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये आपल्याला माहीतच असेल की ई पिक पाहणी हे सुरू केलेले आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना तलाठी किंवा अन्य ठिकाणी न जाता स्वतःच्या मोबाईल वरून स्वतः चा पिक पेरा हा नोंदून शकतो. राज्य राबविण्यात सुरू देखील करण्यात आले आहे. यामध्ये खरीप हंगाम पूर्ण झाला. आता रब्बी हंगामासाठी ई पीक पाहणी सुरू झाला आहे.


यामध्ये पिक पाहणी करण्याची शेवटची मुदत १५ फेब्रुवारी २०२२ देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा या योजनेस मुदत वाढ देण्यात आली आहे,ही मुदत किती आहे. याची शेवटची तारीख काय आहेत आणि पीक पाहणे आपल्याला कसे करायचे आहे.

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या साहाय्याने सर्व खातेदार शेतकरी तलाठ्याकडे न जाता आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक नोंदणी प्रकल्प हा १५ ऑगस्टपासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या ॲप द्वारे आता पर्यंत सुमारे 98 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी भ्रमणध्वनी अॅप द्वारे आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.


सध्या रब्बी हंगामाच्या पीक पाहणीची कार्यवाही सुरु आहे. रब्बी हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदी साठी ई-पीक पाहणी चे 1.0.0.7 हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून दिले आहे. तरी सर्व खातेदार शेतकरी यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. रबी हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी १५ फेब्रुवारी हि अंतिम तारीख निश्चित करून देण्यात आली होती. राज्याच्या काही भागात कोरोना महामारी व उशिराच्या मान्सूनमुळे शेतकर्यांना आपली पीक पाहणी
राज्यस्थरीय अंमलबजावणी समितीच्या दिनांक १५.०२.२०२२ रोजीच्या बैठकीत, ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे शेतकरी स्तरावरील पिक पाहणीची कालमर्यादा १५ फेब्रुवारी वरून २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंतवाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी सर्व शेतकरी बंधूना अवाहन करण्यात येते की, त्यांनी रबी हंगाम२०२२ ची पीक पाहणी वाढीव मुदतीत म्हणजेच दिनांक २८ फेब्रुवारी पर्यंत ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे

आपली पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी.

Leave a Comment