रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी । सरकारची मोठी घोषणा | यापुढे रेशनधान्य…

 पत्रिका धारक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आता तुम्हाला रेशन धान्य हे एकाच रेशन दुकानात नाही तरी इतर रेशन दुकानात सुद्धा घेता येणार आहे तसेच यापुढे तुम्हाला रेशन कार्ड संबंधित कोणतेही काम म्हणजेच नवीन रेशन कार्ड काढणे नवीन नाव रेशन कार्ड मध्ये वाढवणे किंवा रेशन कार्ड मध्ये नावाची दुरुस्ती करणे ही सर्व कामे करण्यासाठी आता तुम्हाला वणवण करण्याची गरज नाही
.


(1) कोणत्याही रेशनदुकानात धान्य घेता येणार


एक वर्षापूर्वी केंद्र सरकारने (वन नेशन वन रेशन) ही योजना काढली


होती, तर आता ही योजना केंद्र सरकार संपूर्ण देशभरात लवकरच लागू करणार आहे. आणि याचा फायदा तुम्हाला देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्याच्या रेशन दुकानात धान्य घेता येणार आहे. आतापर्यंत रेशनकार्ड धारकाला नोंदणी असलेल्या रेशन दुकानातच धान्य मिळत होते, परंतु (वन नेशन वन रेशन) योजनेअंतर्गत तुम्हाला देशातल्या कुठल्याही रेशनदुकानात धान्य मिळू शकेल. ही योजना लागू करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना पत्र देखील पाठवलं आहे.

(2) रेशनकार्ड संबंधित सर्व कामे CSC सेंटर वर उपलब्ध होतील


केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत ग्राहक व्यवहार व सार्वजनिक वितरण मंत्रालय आणि CSC ई-गव्हर्नन्स इंडियामध्ये एक महत्वपूर्ण करार झाला आहे. या अंतर्गत आता रेशनकार्ड धारकांना वेगवेगळ्या सुविधांचा लाभ मिळणार आहे. यामध्ये नवीन रेशनकार्ड काढणे, रेशन कार्डमध्ये नाव वाढविणे, रेशन कार्डमध्ये चुकलेली माहिती दुरुस्ती करणे किंवा रेशनकार्ड संबंधित कोणतीही तक्रार असेल तर आता तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन करता येणार आहे. त्याचबरोबर रेशन कार्डची दुसरी प्रत काढणे, रेशनकार्डला आधारलिंक करणे ही सुद्धा कामे CSC सेंटरमध्येच करता येणार आहेत. देशभरामध्ये 3.70 लाख CSC सेंटरवर ही सर्व कामे उपलब्ध असतील आणि याबाबत केंद्र सरकारने अधिकृतपणे ही माहिती ट्वीट करून दिली आहे. यामुळे देशातील जवळपास 23.64 कोटी रेशनकार्ड धारकांना या सुविधांचा लाभ मिळणार आहे.

Leave a Comment