Kukut Palan Yojana 2022 | शेळी पालन अनुदान योजना | कुकुट पालन अनुदान योजना

 केंद्र शासनाने १२ व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत विविध केंद्र पुरस्कृत योजना एकत्रित करून राष्ट्रीय पशुधन अभियान या नवीन योजनेस संदर्भ  १ येथील दि. २१ मे, २०१४ च्या पत्रान्वये प्रशासकीय मंजुरी प्रदान केलेली आहे. त्यास अनुसरून सदर्भ  २ येथील शासन निर्णयान्वये केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेच्या राज्यातील अंमलबजावणीस प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात आलेली आहे. तदनंतर अभियानाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने वाचा क्र. ५, ६, ७ व ८ .

सदर्भ क्र. ३ येथील पत्रानुसार केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानाबाबतच्या सुधारीत मार्गदर्शक सुचना माहे जुलै, २०२१ मध्ये निर्गमित केलेल्या असून, त्या अंतर्गतचे विविध कार्यक्रम सन २०२१-२२ पासून राबवावयाचे आहेत…


केंद्र शासनाकडून निर्गमित सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीय पशुधन अभियान या अंतर्गत खालीलप्रमाणे ३ उप-अभियानांचा समावेश केलेला आहे.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामार्फत सन २०१४-१५ या आर्थिक वर्षापासून राष्ट्रीय पशुधन अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेची • सध्याची गरज लक्षात घेऊन सन २०२१-२२ पासून राष्ट्रीय पशुधन अभियानाची सुधारित पुनर्रचना करण्यात • आलेले आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या सुधारित योजनेचा उद्देश रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रती पशुची उत्पादकता वाढवणे आणि अशा प्रकारे विकास कार्यक्रमांतर्गत एका छत्राखाली मांस, बकरीचे दूध, अंडी उत्पादन वाढविणे असा आहे. या कार्यक्रमांतर्गत अतिरीक्त उत्पादन देशांतर्गत मागणी पूर्ण केल्यानंतर निर्यात करता येईल. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेची संकल्पना म्हणजे असंघटित क्षेत्रामध्ये • उपलब्ध उत्पादनांसाठी विक्रीकरीता आणि कच्चा माल उपलब्ध होणेकरीता संघटित क्षेत्राशी जोडून उद्योजकता विकास साधणे ही आहे.


केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यात सदर योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने • खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.


सन २०२१-२२ पासून केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM- National Livestock Mission) ही योजना केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यात राबविण्यास याद्वारे शासनाची प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात येत आहे.


सन २०२०-२१ या वर्षापर्यंत केंद्र शासनाने मंजुर केलेल्या व अदयापही ज्या योजनांची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे अशा योजना संदर्भ क्र. २.५, ६, ७ व ८ येथील शासन निर्णयानुसार राबविण्यात याव्यात. तथापि, सन २०२१-२२ पासून केंद्र शासनाकडून मंजूर होणाऱ्या योजनांची अंमलबज शासन निर्णयान्वये करण्यात यावीत.
सदरची योजना केंद्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित झालेल्या होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांन्वये तसेच, राज्यास प्रत्यक्ष वितरित होणाऱ्या केंद्र हिश्याच्या निधीस अनुसरून राबविण्यात यावी. या योजनासाठी देय असलेल्या राज्य हिश्यासाठीचा निधी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागास •दरवर्षा प्राप्त होणाऱ्या नियतव्ययातून अर्थसंकल्पित करण्यात यावा. पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व सदर केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये एकाच स्वरूपाच्या योजनेची पुनरूक्ती होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.


सन २०२१-२२ पासून केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विविध ०३ उप अभियाननिहाय केंद्र शासनाने मंजूर केलेल्या योजनांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 

👉👉योजनेचा शासन निर्णय

:- येथे पहा

Leave a Comment