मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ | Matoshri gram samruddhi shet – panand raste yojana

 

राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्यास आज ११ नोव्हेंबर २०२१ रोजी एक शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली आहे

पाणंद रस्ते योजनेतुन कामे पुर्ण करतांना येणाऱ्या अडचणी व निधीची कमतरता यामुळे सदर योजना अधिक कार्यक्षम करणे गरजेचे झाले होते. त्यानुषंगाने “पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजनेचे” सर्व शासननिर्णय व शुध्दीपत्रके अधिक्रमित करुन सदर योजना अधिक सुटसुटीत करण्यात आली असुन सदर योजनेचे नामकरण “मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना” असे करण्यात आले आहे. त्यानुसार उपरोक्त दिनांक ११/११/२०२१ रोजीचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मनरेगा आणि राज्य रोहयो यांच्या अभिसरणातुन सदर योजना राबवायची असुन शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांकरीता पुरक कुशल निधी राज्य रोहयोंतर्गत उपलब्ध करुन देण्याबाबत सदर शासननिर्णयात तरतुद करण्यात आली आहे. तसेच, अन्य योजनांच्या अभिसरणाव्दारे आणि मनरेगांतर्गत अनुज्ञेय इतर कामे यांच्या संयोजनातुन देखील शेत/पाणंद रस्ते योजना राबविण्याबाबत सदर शासननिर्णयाव्दारे सुचना देण्यात आल्या आहेत.


     👇👇👇

   मंजूर शेत रस्ता यादी

“मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजने” अंतर्गत शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांकरीता पुरक कुशल निधी प्राप्त होण्यासाठी सदर शेत/पाणंद रस्त्यांच्या आराखड्यास शासनस्तरावरुन मान्यता घेणे आवश्यक आहे. त्याकरीता संबंधीत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यामार्फत शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्याबाबतचे वेळापत्रक उपरोक्त शासननिर्णयात नमूद करण्यात आले आहे. तथापि, लोकप्रतिनिधींची मागणी आणि चालु आर्थिक वर्षाचा उर्वरित कालावधी विचारात घेऊन “मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजने” अंतर्गत यावर्षीही शेत/पाणंद रस्त्यांचे प्रस्ताव मागविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार “मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजने” अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी शेत/पाणंद रस्त्यांच्या आराखड्यास मान्यता देण्यासंदर्भात काही जिल्ह्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुषंगाने निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. २.

Leave a Comment