शेळी पालन व शेड योजना 2022| sheli palan shed| sheli palan anudan 2022

शेळी ही गरीबाची गाय समजली जाते. मुख्यत: भूमिहीन शेतमजूर शेळी पालन करतात. भूमिहीन शेतमजूराकडे समृद्धी करिता शेतजमीन नसल्यामुळे शेळीपालन किंवा तत्सम बाबीच श्रीमंती करिता शिल्लक राहतात. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे १० शेळ्यांचा एक गट दिला जातो. शासनाचे अनुदान न मिळाल्यास एका भूमिहीन शेतकऱ्याला स्वतःच्या पैशातून दहा शेळ्या विकत घेणे शक्य होत नाही. त्यामुळे हे स्पष्ट करण्यात येते की दहापेक्षा कमी शेळ्यांचा गट असल्यास त्या शेतमजुराला गरिबीतून बाहेर पडणे अवघड जाते. सध्या बाजारात एक शेळी अंदाजे आठ हजार रुपयात मिळते. रोजगार हमी योजनेतून हा खर्च अनुज्ञेय नाही. एक भूमिहीन शेतमजूर स्वतःच्या पुंजीतून दोन शेळ्या जर विकत घेऊ शकला तर त्या शेळ्यांची संख्या दर सहा महिन्यात किमान दोन पट होते त्यामुळे एका वर्षांत त्या शेतमजूर/शेतकरी यांच्याकडे १० शेळ्यांचा गट निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उपरोक्त सर्व बाबी पाहता किमान दोन शेळ्या असलेल्या भूमिहीन मजुरांना/ शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय करणे योग्य होईल.

तसेच हेही स्पष्ट करण्यात येते की शेळीपालनाच्या शेडसाठी प्रत्येक दहा शेळ्यांसाठी एक गट समजण्यात येईल व त्याप्रमाणे परिपत्रकानुसार अनुदान अनुज्ञेय करण्यात येईल तसेच, ज्या लाभार्थ्याकडे १० पेक्षा अधीक शेळ्या असतील त्यांना शेळ्यांसाठीचे दोन गट लक्षात घेवून दोन पट अनुदान राहील. मात्र एका कुटुंबास जास्तीत जास्त ३० शेळ्यांकरिता तीन पट अनुदान मंजूर करण्यात येईल.

सदर वरील सर्व कागदपत्रे Download करण्यासाठी येथे क्लिक करा 

१) गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे सद्य:स्थिती :

ग्रामीण भागामध्ये जनावरांच्या गोठयाची जागा ही सर्वसाधारणपणे ओबडधोबड व खाचखळग्यानी भरलेली असते, सदरचे गोठे हे क्वचितच व्यवस्थितरित्या बांधले जातात. गोठयांमध्ये मोठया प्रमाणावर जनावरांचे शेण व मूत्र पडलेले असते तसेच पावसाळयाच्या दिवसांत गोठयातील जमिनीस दलदलीचे स्वरुप प्राप्त होते व सदर जागेतच जनावरे बसत असल्यामुळे ते विवीध प्रकारच्या आजारांना बळी पडतात. तसेच काही जनावरांना स्तनदाह होऊन उपचारांसाठी हजारो रुपये खर्च होतात. तर काही वेळेस गाई/म्हशींची कास निकामी होते, त्यांच्या शरीराच्या खालील बाजूस जखमा होतात. बऱ्याच ठिकाणी जनावरांना चारा देण्यासाठी गव्हाणी बांधलेल्या नसतात. त्यांच्यापुढील मोकळ्या जागेवरच चारा टाकला जातो. या चाऱ्यावर बऱ्याच वेळा शेण व मूत्र पडल्याने जनावरे चारा शेळीपालन शेड बांधणे :सद्य:स्थिती :

येथे क्लिक करुन ऑनलाईन फॉर्म (अर्ज) भरा

शेळीपालन हा ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाच्या उपजिवीकेचे महत्वाचे साधन आहे. अल्प उत्पन्न असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी शेळीपालन या व्यवसायाकरिता मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील शेळी मेंढी पालनावर उदरनिर्वाह क|रणारी गोरगरीब कुटूंबे पैशाअभावी शेळया-मेंढयाना चांगल्या प्रकारचा सरंक्षित निवारा देऊ शकत नाहीत. चांगल्या निवाऱ्याअभावी शेळया मेंढयामध्ये विवीध प्रकाराचे जंतजन्य, संसर्गजन्य, बाहयपरजीवी किटकांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोगग्रस्त, खुरटी व आर्थिकदृष्टया फारशी किफायतशीर नसलेल्या शेळया-मेंढयाचे कळप पाळले जातात. याकरिता मागणी केलेल्या प्रत्येक कुटुंबास नरेगा योजनेअंतर्गत शेळीपालन शेड बांधणे हे काम उपलब्ध करुन देण्यात येईल.

2 ग्रामीण भागामध्ये शेळया – मेंढयापासून मिळणारे शेण, लेंडया व मूत्र यापासून तयार होणा-या उत्कृष्ठ दर्जाच्या सेंद्रीय खतांचा पक्क्या स्वरुपाचे व चांगले गोठे नसल्याने नाश होतो. शेळया मेंढयाकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मल, मूत्र एकत्र करुन शेतीमध्ये उत्कृष्ठ प्रकारचे सेंद्रीय खत म्हणून वापर करता येईल. यामुळे शेतीच्या सुपिकतेबरोबरच शेती उत्पादन वाढीवर चांगला परिणाम होऊन उदरनिर्वाहासाठी मदत होऊ शकेल.

नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक दिनांक ०९ ऑक्टोबर, २०१२ अन्वये तसेच नियोजन (रोहयो) विभाग शासन निर्णय दिनांक ०१ ऑक्टोबर, २०१६ मधील परिच्छेद ३.५.९ तरतुदींनुसार, १० शेळयांकरिता ७.५० चौ.मी.निवारा पुरेसा आहे तसेच त्याची लांबी ३.७५ मी. आणि रुंदी २.० मी.असावी. चारही भिंतीची सरासरी उंची २.२० मी. असावी. भिंती १ : ४ प्रमाण असलेल्या सिमेंटच्या व विटांच्या असाव्यात. छतास लोखंडी तुळयांचा आधार देण्यात यावा. छतासाठी गॅल्व्हनाइज्ड लोखंडी पत्रे / सिमेंटचे पत्रे वापरावेत. तळासाठी मुरुम घालावा. शेळयांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधावी.

सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. तसेच भूमिहीन (शेती नसलेले) कुटूंबाना प्राधान्य देण्यात यावे. ,

Leave a Comment